राज्यात पावसाच्या तुटवड्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ हैराण झाले असून पावसासाठी विविध धार्मिक विधी केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील हलगा गावात जुन्या श्रद्धेनुसार ग्रामस्थांनी भीमसेनाचे पाद्यपूजन करून वरुणदेवाकडे पावसासाठी साकडे घातले.

हलगा गावातील कल्लेश्वर देवस्थान पंच कमिटी आणि ग्रामस्थांनी प्रथम कल्लेश्वर मंदिरात पूजा केली. त्यानंतर गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि पाच गावांच्या सीमेवर वसलेल्या ऐतिहासिक भीमसेनाच्या पायांच्या ठिकाणी जाऊन पूजा अर्चा केली. या ठिकाणी पूजा केल्यास नक्कीच पाऊस पडतो या तीव्र श्रद्धेने सर्व ग्रामस्थ आणि नेत्यांनी एकत्र येत धुमधडाक्यात पाऊस पडू दे, अशी प्रार्थना केली.



Recent Comments