Belagavi

गरीब शेतकऱ्याच्या मुलाला तब्बल १२ सुवर्णपदके1

Share

विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठाच्या २६ व्या पदवीदान समारंभात एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाने तब्बल १२ सुवर्णपदके पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कठीण परिस्थितीवर मात करत त्याने आपल्यावर टीका करणाऱ्यांना यशाच्या माध्यमातूनच चोख उत्तर दिले आहे.

दावणगेरे येथील जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी एच. एम. विश्वनाथ याने १२ सुवर्णपदके मिळवून या वर्षीच्या पदवीदान समारंभात सर्वाधिक पदके मिळवणारा विद्यार्थी होण्याचा मान पटकावला. त्याचे वडील मंजुनाथ हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी अत्यंत कष्टाने मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलला, तर आई नागमा, भाऊ षण्मुख आणि मामा यांनी त्याला अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून हे यश मिळवण्यासाठी मोलाची साथ दिली.

विश्वनाथला एसएससीमध्ये ८४ टक्के आणि पीयूसीमध्ये ७२ टक्के गुण मिळाले होते, मात्र त्यानंतर त्याला डेंग्यूची लागण झाल्याने गंभीर आजारपणाचा सामना करावा लागला. आजारपणातून सावरल्यानंतर एका खाजगी नेटवर्क मार्केटिंग कंपनीत काम करताना खचलेल्या विश्वनाथला त्याच्या काकांनी आणि मामाने आधार देऊन पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले आणि अभ्यासासाठी मदत केली.

Tags: