Belagavi

रामतीर्थनगर येथे बस थांब्यासाठी रहिवाशांचे निवेदन

Share

बेलगावी येथील रामतीर्थनगर येथे अतिरिक्त बस थांब्याची मागणी करत रहिवाशांनी वायव्य रस्ते वाहतूक महामंडळाचे विभाग नियंत्रक शशीधर मरिदेवरामठ यांना निवेदन दिले.

रामतीर्थनगर येथील रहिवाशांनी कार्यसिद्धी आंजनेय स्वामी मंदिरा जवळ बस थांब्याची मागणी केली आहे. यावर बोलताना विभाग नियंत्रक शशीधर मरिदेवरामठ यांनी अधिकाऱ्यांमार्फत जागेची पाहणी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच गुरुवारी हिडकल-बेलगावी बसमधील ज्येष्ठ नागरिकांशी उद्धट वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. या वेळी गणेश मंदिराचे अध्यक्ष सी. एस. बिडनाळ, बसवराज मादेगौडर, महेश माविनकट्टी, मंजुनाथ पाटील, शिवानंद मठपती, प्रकाश दीक्षित यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

Tags: