Belagavi

संत मीरा शाळेत ‘वंदे मातरम’चा १५० वा वर्धापन दिन साजरा

Share

बेलगावी येथील अनगोळ परिसरातील संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘वंदे मातरम’ गीताचा १५० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

‘नमामी भारत’ या विशेष संकल्पनेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य अतिथी सौरभ कुलकर्णी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासकीय अधिकारी राघवेंद्र कुलकर्णी, कृष्ण भट, अशोक शिंत्रे आणि उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांनी दीपप्रज्वलनाने केले. इयत्ता १ ली ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन करून उपस्थितांची मने जिंकली. मुख्य अतिथी सौरभ कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकता आणि देशभक्तीचे महत्त्व पटवून दिले.

Tags: