Khanapur

शिवठाण गणेशोत्सव विसर्जन सोहळ्यात रफीक हलशीकर यांचा सहभाग

Share

खानापूर तालुक्यातील शिवठाण येथे गणेशोत्सव विसर्जन सोहळ्यात रफीक हलशीकर यांनी हजेरी लावली. रस्ते दुरुस्तीसारख्या सामाजिक कामांमुळे सर्वधर्मीयांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

मौजे शिवठाण येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन सोहळ्यात खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीचे संचालक व माजी ग्रामपंचायत सदस्य रफीक हलशीकर यांनी सहभाग घेतला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घोटगाळी-देवराई-जांबेगाळी रस्त्यावरील खड्डे स्वतःच्या खर्चाने बुजवून त्यांनी आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या या समाजसेवेची दखल घेऊन शिवठाण गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दीपप्रज्वलन करून त्यांचा सत्कार केला. जाती-धर्माचा भेद न बाळगता एकमेकांशी आपुलकीने जगणारे असे व्यक्तिमत्त्व आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Tags: