Khanapur

नागरगाळी क्रॉसजवळ बोलेरो झाडावर धडकली

Share

रामनगर-अळणावर मार्गावरील नागरगाळी क्रॉसजवळ बोलेरो पिकअप वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याकडील झाडावर धडकले. या अपघातात बास्तवाड येथील रहिवासी शहाजहान शिल्लेदार यांचा जागीच मृत्यू झाला असून, गजबाज खानापुरी हे गंभीर जखमी झाले आहेत.

हुक्केरी तालुक्यातील रफिक सलीम मुल्ला हे आपल्या बोलेरो पिकअप वाहनातून गजबाज खानापुरी आणि शहाजहान यांना घेऊन रामनगरकडून अळणावरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. नागरगाळी क्रॉसजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट रस्त्याकडील झाडावर जाऊन आदळले.

झाडाला लागलेल्या तीव्र धडकेमुळे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने शहाजहान शिल्लेदार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झालेल्या गजबाज खानापुरी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेत चालक रफिक मुल्ला हे किरकोळ जखमी झाले असून, खानापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: