हुक्केरी तालुक्यातील स्वामी विवेकानंद शाळेची विद्यार्थिनी खुषी महावीर चौगुले हिने जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राज्य पातळीवर यश मिळविले आहे.


कुडची येथील सरकारी शाळेत झालेल्या चिकोडी शैक्षणिक जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत हुक्केरी तालुक्यातील स्वामी विवेकानंद शाळेच्या खुषी चौगुले हिने उत्कृष्ट कामगिरी करत राज्य पातळीवर निवड निश्चित केली आणि हुक्केरी तालुक्याचा गौरव वाढवला. या यशानंतर पार पडलेल्या साध्या कार्यक्रमात तिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तिच्या या यशाबद्दल रीड्स संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्यासह शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.

जिल्ह्यातील सरकारी व खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित तायक्वांदो स्पर्धांमधील विजेत्यांना राज्य पातळीवर खेळण्याची संधी मिळते, त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे बेळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव प्रभाकर शेडबाळे यांनी सांगितले. त्यानंतर गुणवंत खेळाडूंना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


Recent Comments