आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश न केल्याच्या निषेधार्थ आमदारकीचा राजीनामा दिल्याने विधानसभेत जोरदार गोंधळ उडाला.

विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी यशवंतरायगौडा पाटील यांच्या राजीनाम्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राजीनामा मंजूर करण्याचे आव्हान देत त्यांनी सरकारला धारेवर धरले.

यावर स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यशवंतरायगौडा यांनी हा निर्णय भावनिक होऊन आणि जनतेच्या हितासाठी घेतला असल्याचे सांगितले. त्यांची समजूत काढण्यात आली असून हा कोणताही राजकीय राजीनामा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभागृहात या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधी पक्षाने यावर सभापतींनी तत्काळ निर्णय घेण्याची मागणी लावून धरली.
विरोधकांच्या गदारोळामुळे आणि कोणत्याही निर्णयाविना सभापतींनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.


Recent Comments