Belagavi

राणी चन्नम्मा विद्यापीठात ३२ लाखांची फसवणूक

Share

बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि एनपीएसचे ३२ लाख रुपयांहून अधिक पैसे परस्पर काढून फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस आयुक्त प्रकाश निकम म्हणाले की, विद्यापीठातील काही कर्मचारी आणि एफडीए यांनी हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. २०२o ते २०२३ या कालावधीत विद्यापीठाच्या ऑनलाईन बँक खात्यातील भविष्य निर्वाह निधी व एनपीएसची रक्कम विविध खात्यांमध्ये बेकायदेशीरपणे वर्ग करून वैयक्तिक फायद्यासाठी वापरण्यात आली.

विद्यापीठाच्या तक्रारीवरून काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्राथमिक तपासात चार जण यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या या प्रकरणाचा अंतर्गत तपास आणि ऑডিট प्रक्रिया तीव्र करण्यात आली असून, तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिली.

Tags: