पोल्ट्री फार्म एनओसीसाठी ६ हजार रुपयांची लाच घेताना खानापूरचे तालुका आरोग्य अधिकारी आणि वरिष्ठ सहाय्यक लोकायुक्त पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत.

खानापूर तालुक्यातील कामशिनकोप्प येथील माजी सैनिक उदय चवलगी यांनी पोल्ट्री फार्म एनओसीसाठी अर्ज केला होता. परवानगीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश किवडसण्णवर आणि वरिष्ठ सहाय्यक बीरप्पा राजापुरी यांनी लाच मागितली. यावर तक्रारदाराने कदंब सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जोर्डन गोन्साल्विस यांच्या मार्गदर्शनाखाली लोकायुक्त पोलिसांत तक्रार दिली.

लोकायुक्त डीएसपी बी. एस. पाटील यांच्या पथकाने छापा टाकून ६ हजार रुपयांची लाच घेताना वरिष्ठ सहाय्यक बीरप्पा राजापुरी याला रंगेहात पकडले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश किवडसण्णवर यांच्या भूमिकेबाबत तपास सुरू असून दोघांना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


Recent Comments