गणेशोत्सवाचे औचित्य साधून बबन भोबे मित्रमंडळाच्या वतीने गरजू महिलेवर डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया आणि रुग्णासाठी तातडीने रक्ताची सोय करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने बबन भोबे मित्रमंडळाने उपक्रम राबवत अनगोळ येथील एका गरजू महिलेच्या डोळ्यांवर सुलोचना रुग्णालयाचे डॉ. प्रसाद जिरगे यांच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करून घेतली.

निरंजन केसरीकर यांच्या तातडीच्या उपचारासाठी केएलई रुग्णालयात ‘ओ पॉझिटिव्ह’ रक्ताची सोय श्री शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण गावडे यांच्या पुढाकाराने करण्यात आली. या सामाजिक कार्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे बबन भोबे यांनी आभार मानले.
यावेळी श्यामसुंदर हावळ, सतीश साखरदांडे, शिंदे, मंदा नेवगी आणि संतोष पुरोहित यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments