Khanapur

“खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करा. “

Share

खानापूर तालुका घनदाट जंगलाने व्यापलेला तालुका मात्र यंदा खानापूर तालुक्यात पावसा अभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तालुक्याच्या विविध भागात भात पिकासह इतर पिकावर पावसाअभावी मोठा परिणाम झाला आहे.तेव्हा खानापूर तालुक्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत समाविष्ठ करावा.अशा मागणीचे निवेदन समाज सेवक भरमाणी पाटील (सन्नहोसुर) यानी सोमवारी दि.२१ रोजी तहसीलदार दुंडाप्पा कोमार याना सादर केले.

निवेदनात म्हटले आहे.की,खानापूर तालुका अति जंगलाने व्यापलेला तालुका असुन तालुक्यात पावसा आभावी पिकावर मोठा परिणाम झाला आहे.
पिके कोमेजुन गेली आहेत. येत्या.काही दिवसात पाऊस झाला नाही.पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
तेव्हा सरकारने त्वरित परिस्थितीची जाणीव ठेवून लागलीच खानापूर तालुका दुष्काळ ग्रस्त तालुका म्हणून जाहिर करावा‌. ‌अशी मागणी समाज सेवक भरमाणी पाटील यानी निवेदनाव्दारे केली.

“निवेदनात प्रमुख मागण्याही केल्या आहेत”

*शेतकरीवर्गाला एकरी ५० हजार रूपयाची मदत करावी.
*शेतकर्याचे कर्ज माफ करावे.
*शेतमुजीरवर परिणाम झालेल्या कामगाराना ३५ हजार रूपये सहाय्यधन मंजुर करावे.
अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

#आमरण उपोषणाचा इशारा

तहसीलदाना दिलेल्या मागण्याची गंभीरपणे दखल न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा समाज सेवक भरमाणी पाटील यानी दिला आहे.
निवेदन देताना भरमाणी पाटील,विजय चौगुले, हणमंत पाटील, आनंद चोपडे, मारूती पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार दुंडाप्पा कोमार यानी नि वेद नाचा स्विकार करून सरकारकडे पाठवुन देण्याचे आश्वासन दिले.

Tags: