Belagavi

बेळगाव उत्तर मतदारसंघात विकासकामांचा शुभारंभ

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघातील शिवतीर्थ कॉलनी अंतर्गत येणाऱ्या न्यू वृंदावन कॉलनीत आमदार आसिफ सेठ यांनी विविध विकासकामांचा शुभारंभ केला.

या विकासकामांतर्गत परिसरात सीसी रस्ते, पेव्हर्स ब्लॉक बसवणे आणि भुयारी गटारांचे बांधकाम केले जाणार आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांची दैनंदिन वाहतूक सुलभ होणार असून परिसरातील मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी युवा नेते अमान सेठ उपस्थित होते. सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर आपला विशेष भर असेल, असे आश्वासन आमदार आसिफ सेठ यांनी यावेळी दिले.

आमदारांच्या या तत्परतेबद्दल आणि प्रभागातील विकासकामांबद्दल न्यू वृंदावन कॉलनीतील स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.

Tags: