Belagavi

बेळगावात ६ व्या जिल्हास्तरीय गणेशोत्सव कराटे स्पर्धेचा थाट

Share

: बेळगाव श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ६ व्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचा शनिवारी (१९ सप्टेंबर) श्री दानम्मादेवी मंगल कार्यालयात उत्साहात शुभारंभ झाला.

बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या वतीने १९ आणि २० सप्टेंबर असे दोन दिवस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील १४ आणि १७ वर्षांखालील गटातील ७५० हून अधिक बाल व तरुण कराटेपटूंनी सहभाग नोंदवला आहे.

उद्घाटन सोहळ्याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष गजानन काकतीकर व सचिव जितेंद्र काकतीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लहान मुलांमध्ये कराटे खेळाची आवड निर्माण व्हावी आणि स्थानिक खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळावी, या उद्देशाने दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते, असे आयोजकांनी सांगितले.

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके आणि प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ चषक देऊन गौरवले जाणार आहे. जिल्ह्यातील खेळाडू आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन घडवत असून, क्रीडाप्रेमींकडून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे.

Tags: