बेळगाव येथील देसूर गावात सीसीबी पोलिसांनी छापा टाकून बेकायदेशीरपणे साठवलेले पेट्रोल आणि डिझेल जप्त केले असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

देसूर गावातील हॉट पॉट ढाब्याजवळ सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या वेळी तमीम यरगट्टी आणि साकीब अन्सारी यांना ताब्यात घेण्यात आले. इस्रार मुल्ला याच्या सूचनेनुसार हे दोघे विक्रीसाठी इंधन घेऊन जात होते. पोलिसांनी ६ लाख ८९ हजार रुपये किमतीच्या वाहनासह ९० हजार रुपये किमतीचे ९०० लिटर डिझेल आणि ९९ हजार रुपये किमतीचे ९०० लिटर पेट्रोल जप्त केले. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Recent Comments