हुक्केरी कृषी विभागातर्फे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत १३७ शेतकऱ्यांना कृषी उपकरणांचे वाटप आमदार निखिल कत्ती यांच्या हस्ते करण्यात आले.


कृषी विभागाचे सहाय्यक संचालक महादेव पटगुंदी यांनी लाभार्थी निवडीची माहिती आमदारांना दिली. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना एम. बी. नांगर, रोटाव्हेटर, पॉवर टिलर, मळणी यंत्र, चारा कापणी यंत्र आणि ट्रॅक्टरचलित उपकरणांचे वाटप करून प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या वेळी केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून मिळालेल्या या साहित्याचा योग्य वापर करावा, असे आमदार निखिल कत्ती म्हणाले.


या वेळी हुक्केरी तालुका कृषक समाजाचे अध्यक्ष अॅड. बी. के. मगेन्नवर यांनी हुक्केरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवावा, अशी मागणी आमदारांकडे केली. निवेदन स्वीकारताना पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असून भरपाईसाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती आमदारांनी दिली.

या कार्यक्रमाला महावीर निलजगी, गुरू कुलकर्णी, सत्यप्पा नाईक, ए. के. पाटील, शितल बॅळी, राचय्या हिरेमठ, परप्पा वासेदार, परप्पा मगदूम, शिवगौडा पाटील तसेच कृषी अधिकारी राघवेंद्र तळवार, शिवानंद कामत व प्रकाश पाटील उपस्थित होते.

राजू बागलकोटी
इन न्यूज, हुक्केरी


Recent Comments