Belagavi

व्हीटीयू जलतरण स्पर्धेत जीआयटीला उपविजेतेपद

Share

बेळगाव येथील ‘केएलएस जीआयटी’ इंजिनिअरिंग कॉलेजच्या महिला जलतरण संघाने व्हीटीयू राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उपविजेतेपद पटकावून दैदिप्यमान यश मिळवले आहे.

संगणकशास्त्र प्रथम सत्राची विद्यार्थिनी सुनिधी हळकारे हिने ४ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ७ पदके जिंकून अफाट कामगिरी केली. तिच्या या कामगिरीच्या जोरावर तिची चेन्नई येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी व्हीटीयूच्या संघात निवड झाली आहे. तिच्यासोबतच अजिंक्या सुंगार आणि स्वयं कारेकर यांनीही पदके जिंकून संस्थेचे नाव उज्ज्वल केले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि क्रीडा शिक्षकांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Tags: