हिरेबागेवाडीहून बेळगावच्या दिशेने निघालेल्या कारचे टायर फुटून दुभाजकाला धडकल्याची घटना घडली.


हिरेबागेवाडीहून बेळगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टाटा कंपनीच्या कारचे टायर अचानक फुटल्याने, चालकाचे नियंत्रण सुटलेले वाहन थेट रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाला जाऊन भीषणपणे धडकले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कारंमध्ये केवळ चालक एकटाच होता, असे समजते. घटनेच्या ठिकाणी तातडीने धाव घेतलेल्या हायवे पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांनी व हिरेबागेवाडी ठाण्याच्या पोलिसांनी, वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत केली..



Recent Comments