सरकारी वाहतूक बसचा ॲक्सल अचानक तुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना विजयनगर जिल्ह्यातील हगरीबोम्मनहळ्ळी तालुक्यातील तांब्रहळ्ळीजवळ घडली.


धावत्या बसचा ॲक्सल तुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. या अपघातात बस चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधील ३० हून अधिक प्रवासी सुखरूप आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिवहन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.



Recent Comments