Belagavi

बेळगाव ढोर गल्लीतील दुर्घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

Share

बेळगावमधील ढोर गल्ली येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज महसूल आणि समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

ढोर गल्लीतील पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.बेळगावचे तहसीलदार हनुमंत शिरहट्टी, समाजकल्याण विभागाचे सहसंचालक रामनगौडा कन्नोळ्ळी आणि महसूल निरीक्षक चंद्रशेखर होनकल्ली यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पीडित कुटुंबाची परिस्थिती पाहून त्यांनी सरकारी स्तरावरून तातडीची मदत देण्याचे आश्वासन दिले.

राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी दलित नेते मल्लेश चौगुले यांनी केली. पीडित कुटुंबाला किमान १० लाख रुपयांची भरपाई आणि राहण्यासाठी नवीन घर बांधून द्यावे, असेही त्यांनी सुचविले.

Tags: