Khanapur

सर्वोदय हायस्कूलच्या विद्यार्थिनींची तायक्वांदो स्पर्धेत बाजी

Share

खानापूर तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सर्वोदय इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली.

तालुकास्तरीय माध्यमिक शाळांच्या तायक्वांदो स्पर्धेत सर्वोदय इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कौशल्याचे प्रदर्शन केले. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी प्रतीक्षा गुरव आणि अंकिता गौडा यांनी या स्पर्धेत विजय मिळवत प्रथम स्थान पटकावले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य फादर नेल्सन पिंटो आणि क्रीडा शिक्षक जुजे डिसोजा यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि पालकांनीही अभिनंद केले आहे.

Tags: