बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील विविध गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांनी भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले.


आंबेवाडी, कंग्राळी बुद्रुक, गणेशपूर आणि बीजगर्णी या गावांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील श्री गणेशाचे दर्शन घेऊन विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचा आमदारांनी आनंद घेतला; मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देत त्यांनी नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना केली.


यावेळी काडा अध्यक्ष युवराज कदम, युथ काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बाळू देसूरकर, जयवंत बाळेकुंद्री, लक्ष्मी येळ्ळूरकर, पुंडलिक भांदुर्गे, शिवाजीराव रक्षे, अमूल भातकांडे, भाऊराव तुडवेकर, योगेश राक्षे, विक्रम तरळे, शिवाजीराव कांबळे, मल्लप्पा तरळे, दत्ता ठाकरे, मोहन सांबरेकर, एस. पाटील, महादेव पोदार, चंद्रशेखर शिरहट्टी, चंद्रकांत कडगे, सागर गोडसे यांच्यासह स्थानिक नेते, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.




Recent Comments