Belagavi

अनगोळ रोडवरील वाहतूक कोंडीला आळा!

Share

गणेशोत्सवाच्या उत्साहात रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अनगोळ मराठी शाळेपासून ते धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीसाठी पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे.

बेळगाव येथील अनगोळ मराठी शाळा ते धर्मवीर संभाजी महाराज चौक या मार्गावर श्री गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. ही बाब लक्षात घेऊन टिळकवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड्स लावून योग्य पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत नसून सुरक्षितरीत्या वाहतूक सुरू आहे. पोलिसांच्या या तत्पर आणि जनहितार्थ केलेल्या कामाबद्दल स्थानिक नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.

Tags: