Khanapur

खानापुरात श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते प्रारंभ

Share

खानापूर शहरात श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त भव्य आणि दिव्य मिरवणूक अत्यंत उत्साहात पार पडली. स्थानिक श्री चौराशीदेवी मंदिरात आमदार विठ्ठल हलगेकर यांनी विशेष पूजा करून व नारळ वाढवून या मिरवणुकीचा औपचारिक प्रारंभ केला.

या वेळी बोलताना आमदार हलगेकर यांनी, विश्वकर्मा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी आपण नेहमी कटिबद्ध असून आवश्यक ते सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. खानापूर शहरात आयोजित ‘श्री विश्वकर्मा जयंती’ उत्सव समाजबांधवांच्या उत्साहात संपन्न झाला.

तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेकडो विश्वकर्मा समाजबांधव, महिला व नागरिक या ऐतिहासिक मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आकर्षक रथ आणि पारंपरिक गजरात निघालेल्या या मिरवणुकीने खानापूर शहरात धार्मिक वातावरण निर्माण केले होते.

Tags: