बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त कार्तिक एम. यांनी शहरातील ऐतिहासिक किल्ले तलावाच्या (कोटे केरे) विकासकामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.


गुरुवारी किल्ले तलावाला भेट देऊन आयुक्तांनी ‘अमृत योजने’अंतर्गत तलाव परिसर व सुशोभिकरणासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी उपस्थित अभियंत्यांकडून कामाची तांत्रिक माहिती घेत त्यांनी आवश्यक सुधारणांबाबत सूचना दिल्या.

योजनेच्या आराखड्यानुसार (ब्लूप्रिंट) सर्व कामे दिलेल्या मुदतीत आणि अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना दिले. या पाहणी प्रसंगी महानगरपालिकेच्या लक्ष्मी सुळगेकर, अनूप, अमृत योजनेचे अभियंते, कंत्राटदार आणि मनपा कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments