देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप खानापूर मंडलाच्या वतीने विशेष पूजा आणि रुग्णांना फळवाटप करून हा दिवस अर्थपूर्णरीत्या साजरा करण्यात आला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खानापूर शहरातील ग्रामदैवत श्री चौरशी देवी मंदिरात आमदार विठ्ठल हलगेकर यांनी विशेष पूजा करून पंतप्रधानांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर खानापूर येथील सरकारी रुग्णालयाला भेट देऊन आमदारांनी रुग्णांच्या तब्येतीची चौकशी केली व त्यांना फळांचे वाटप केले. या कार्यक्रमाला भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Recent Comments