Belagavi

राज्यातील काँग्रेस सरकार पूर्णपणे अस्थिर; पक्षात अंतर्गत कलह टोकाला! : खास. शेट्टर

Share

काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी वाढली असून हे सरकार पूर्णपणे अस्थिर आहे, असा घणाघात खासदार जगदिश शेट्टर यांनी केला.

माध्यमांशी बोलताना शेट्टर म्हणाले की, ईडी ही एक स्वतंत्र संस्था असून तिच्या कारवाईत कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या विधानाचा संदर्भ देत काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या तिजोरीत निधी उरलेला नसून विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. कंत्राटदारांची बिले थकली आहेत. बेळगाव-कित्तूर-धारवाड या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने पुरेसा निधी दिलेला नाही. त्यामुळे सरकारने केंद्रावर बोट न दाखवता राज्यातील १९० हून अधिक तालुक्यांमध्ये तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

युपीआय शुल्काबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना, सार्वजनिक हिताचा विचार करूनच योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

Tags: