Belagavi

काडा कार्यालयासमोर नवीन बस स्थानकाचे लोकार्पण

Share

बेळगाव येथील काडा कार्यालयासमोर खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या नवीन बस निवाऱ्याचे लोकार्पण खासदार जगदिश शेट्टर यांच्या हस्ते करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त जगदिश शेट्टर यांनी राणी चेन्नम्मा चौकातील श्री गणेश मंदिरात पूजा करून प्रार्थना केली.

यानंतर बोलताना शेट्टर यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या सेवेनिमित्त महिनाभर सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. बेळगावात बस शेल्टरचे उद्घाटन करण्यात आले असून बिम्समध्ये दिव्यांगांना उपकरणांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी खासदार मंगल अंगडी, माजी आमदार अनिल बेनके आणि संजय पाटील उपस्थित होते.

Tags: