बेळगाव तालुक्यातील उत्तर भागात येणाऱ्या अलतगा भागात ‘भावेश्वरी स्वीट मार्ट’ या बेकरीला मंगळवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे १२ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.


माया सागर पाटील यांच्या मालकीच्या या दुकानात रात्री १० च्या सुमारास अचानक आग लागली. आगीची तीव्रता जास्त असल्याने दुकानातील साहित्य व माल पूर्णपणे जळून खाक झाला. या दुर्घटनेत शेजारील रुपेश लक्ष्मण चौगुले आणि युवराज पाटील यांच्या मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे विशेष साहाय्यक व केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शासकीय उपाययोजनांतून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.


Recent Comments