गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना महापालिकेच्या नागरिकांनी कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता बाळगावी, असे आवाहन महापौर प्रीती कामकर यांनी केले.


महापालिकेत बसवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्तीची नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा करून त्यांनी शुभेच्छा दिल्या. चांगला पाऊस-पाणी होऊन नागरिकांना सुख, शांती व समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना श्री विघ्नहर्त्याचरणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी सांगितले की, उत्सवापूर्वी जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यातील नियोजनानुसार उत्सव शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व पावले उचलली आहेत. बेळगावचा गणेशोत्सव संपूर्ण राज्यासाठी आदर्श असून सर्वांनी श्रद्धेने आणि आनंदाने यात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.
या वेळी महापालिका आयुक्त कार्तिक एम., सत्ताधारी पक्षाचे नेते संतोष पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रेयस नाकाडी, रमेश मैलूगोळ, राजू भातकांडे, सारिका पाटील यांच्यासह नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments