बेळगाव शहरातील ढोर गल्ली आणि चव्हाट गल्ली परिसरात घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या पिता-पुत्राचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे या दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या ६ वर पोहोचली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात लागलेल्या या आगीत एकाच कुटुंबातील चार महिलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता. यात भारती राजा राम ढमोणे, शारदा गजानन ढमोणे, प्रिया गजानन ढमोणे आणि गंगा गजानन ढमोणे यांचा समावेश होता. त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर आज उपचारादरम्यान गजानन ढमोणे आणि त्यांचा मुलगा रोशन ढमोणे या दोघांचीही प्राणज्योत मालवली.

या दुर्दैवी घटनेत संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडल्याने ढोर गल्ली आणि चव्हाट गल्ली परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.


Recent Comments