Hukkeri

संकेश्वर जवळील सोलापूर गावातील जवानाची आत्महत्या

Share

संकेश्वर जवळील सोलापूर गावातील एका जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

भारताच्या सीमेवर कार्यरत असलेले ३३ वर्षीय जवान अण्णासाहेब शिवाजी मोहिते हे गणेशोत्सवासाठी सुट्टी काढून आपल्या सोलापूर गावी आले होते. गणेशचतुर्थीच्या दिवशी घरात गणपतीची स्थापना करून सणाचा आनंद साजरा केल्यानंतर त्याच रात्री ते घरातून बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी हरगापूर टेकडीजवळील मोरारजी देसाई निवासी शाळेच्या परिसरातील एका झाडाला त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.

संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपती कोगणोळी यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अण्णासाहेब मोहिते हे गेल्या काही दिवसांपासून तीव्र पोटदुखीच्या त्रासाने त्रस्त होते आणि याच त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती त्यांच्या पत्नी सावित्री यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत दिली आहे.

सोलापूर गावात मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी पार्थिवाला लष्करी मानवंदना देऊन अंतिम संस्कार पार पाडले.

राजू बागलकोटी
इन न्यूज, हुक्केरी.

Tags: