बेळगाव शहराचे नूतन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेले आयपीएस अधिकारी प्रकाश निकम यांचा विजय कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालयात सत्कार करण्यात आला.


शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. “पोलीस यंत्रणेच्या जनहितार्थ उपक्रमांना आमचा पाठिंबा राहील,” असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले. या प्रसंगी संघटनेचे जिल्हा व तालुका पातळीवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



Recent Comments