Belagavi

पीओपी गणेश मूर्तींवर कडक बंदी; नियम मोडल्यास कारवाई

Share

न्यायालयाच्या आदेशानुसार पीओपी गणेश मूर्तींच्या प्रतिष्ठापनेवर व विसर्जनावर बंदी असून नियम मोडल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला आहे.

बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सार्वजनिक हितासाठी हा नियम करण्यात आला असून सर्वांनी याचे पालन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या वतीने मातीच्या गणेश मूर्ती बसवण्याबाबत जनजागृती केली जात आहे. लोक घरात मातीचे गणपती बसवत आहेत, परंतु सार्वजनिक मंडळांनी पीओपीच्या मूर्ती बसवणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासन गंभीर असून यंदा नियम मोडल्यास पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला.

Tags: