हुक्केरी मतदारसंघातील जनतेने कर्नाटक सरकारच्या प्रजासेवा अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार निखिल कत्ती यांनी केले.

हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरातील एपीएमसी आवारात वनस्पतीला पाणी घालून आमदार निखिल कत्ती यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमास तहसीलदार बळराम कट्टीमनी, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी टी. आर. मल्लाडद, नगरपालिका मुख्याधिकारी प्रकाश मठद यांच्यासह विविध सरकारी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आम्ही विरोधी पक्षात असलो तरी शासनाच्या चांगल्या उपक्रमांचे स्वागत करतो, अशा शब्दांत आमदार निखिल कत्ती यांनी या अभियानाला पाठिंबा दर्शवला. सर्वसामान्य नागरिकांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांकडून विविध समस्यांबाबत निवेदने स्वीकारण्यात आली.
राजू बागलकोटी, इन न्यूज, हुक्केरी


Recent Comments