Belagavi

खासदार जगदीष शेट्टर यांनी घेतली जारकीहोळी बंधूंची भेट

Share

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निकटवर्तीयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, भाजप खासदार जगदीष शेट्टर यांनी गोकाक येथे जारकीहोळी बंधूंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

माजी मुख्यमंत्री आणि खासदार जगदीष शेट्टर यांनी गोकाक येथील विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिली. तेथे त्यांनी माजी मंत्री रमेश जारकीहोळी आणि लखन जारकीहोळी यांच्यासोबत तासभरापेक्षा जास्त वेळ चर्चा केली.

सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित संस्थांवर ईडी अधिकाऱ्यांनी छापे टाकून चौकशी केल्यानंतर लागलीच ही भेट झाली आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये झालेली ही भेट आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

Tags: