Belagavi

शिंदोळीच्या तन्वी अगसीमणीचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

Share

राष्ट्रीय पातळीवरील मंचावर ग्रामीण विद्यार्थिनीने आपल्या प्रतिभेच्या बळावर कर्नाटकचे नाव उज्ज्वल केले आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारून तन्वी तानाजी अगसीमणी हिने बेळगावचा गौरव वाढवला आहे.

सरकारी वरिष्ठ प्राथमिक कन्नड शाळा शिंदोळी येथे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेतलेली आणि सध्या सरकारी हायस्कूल सांबरा येथे नववीत शिकणारी तन्वी तानाजी अगसीमणी हिने ‘स्मार्ट इंडिया उभारणीत तरुणांची भूमिका’ या विषयावरील राष्ट्रीय निबंध स्पर्धेत यश मिळवले. याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तिला प्रशस्तीपत्र आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

तन्वीच्या या यशाबद्दल समाजसेवक वीरभद्रय्या बाबू पुजारी यांनी तिचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शिंदोळी गावातील ज्येष्ठ नागरिक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनीही तन्वीच्या यशाबद्दल कौतुक केले आहे.

Tags: