Hukkeri

हुक्केरीत शासनाच्या आदेशानुसारच वीज पुरवठा: पृथ्वी कत्ती

Share

राज्य शासनाच्या आदेशानुसारच वीज कपात केली जात असल्याचे वीज सहकारी संघाचे संचालक पृथ्वी कत्ती यांनी सांगितले.

अलीकडेच हुक्केरी तालुक्यात वीज सहकारी संघातर्फे करण्यात येत असलेल्या वीज कपातीमुळे शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सूक्ष्म-लघु उद्योगांना होणाऱ्या त्रासाबाबत हुक्केरी ग्रामीण वीज सहकारी संघाच्या संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन वीज पुरवठ्यातील अडचणींची माहिती दिली.

पत्रकारांशी बोलताना संघाचे संचालक पृथ्वी कत्ती म्हणाले, राज्यात पावसाच्या तुटवड्यामुळे वीज निर्मितीत घट झाली आहे. त्यामुळे शासनाकडून मिळालेल्या आदेशानुसार वीज कपात करणे भाग पडत असून हुक्केरी तालुक्यातील जनतेने संघाच्या संचालक मंडळाला आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. तालुक्याला अतिरिक्त वीज पुरवठा करावा, यासाठी शासनाकडे निवेदन पाठवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

संघाचे अध्यक्ष महावीर निलजगी म्हणाले, सहकार तत्त्वावर चालणाऱ्या राज्यातील एकमेव वीज सहकारी संघाला अधिक वीज मिळावी, यासाठी ऊर्जा मंत्र्यांना लवकरच निवेदन देऊन नागरिकांची अडचण दूर केली जाईल. या वेळी संचालक विनय पाटील, गजानन कव्हळी, शिवानंद मुडशी, लाजम नाईकवाडी, स्थानिक अभियंता नेमिनाथ सोल्लापुरे, उदय मगदूम, मंजुनाथ कुदनुरी आदी उपस्थित होते.

Tags: