शिक्षकदिनाचे औचित्य साधून बेळगाव येथील टिळकवाडीस्थित जीजीसी इंग्लिश मिडीयम हायस्कूलच्या प्राचार्य डॉ. नवीना शेट्टीगार यांना एकाच दिवशी तीन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

डॉ. नवीना शेट्टीगार यांना ‘बेला’ संस्थेतर्फे ‘जीवनगौरव शिक्षण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अभिनेते सुदेश बेरी आणि बेलाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी खिलारी यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.

त्याच दिवशी हैदराबाद येथील हॉटेल व्यंकटेश्वरा अबोड येथे आयोजित कार्यक्रमात ‘ॲसोसिअट ऑफ अलायन्स क्लब्स इंटरनॅशनल’तर्फे त्यांना ग्रीन पोस्टर स्पर्धेतील नेतृत्वाबद्दल ‘आंतरराष्ट्रीय प्रशंसा पुरस्कार’ देण्यात आला. तसेच त्यांच्या उत्कृष्ट सेवाभावी वृत्तीबद्दल संस्थेचा सर्वोच्च ‘ॲम्बेसेडर ऑफ गुडविल अवॉर्ड’ देऊनही त्यांना गौरविण्यात आले.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष ॲली डॉ. बाला जी शास्त्री, आंतरराष्ट्रीय सचिव ॲली नागराज बैरी यांच्यासह इतर आंतरराष्ट्रीय प्रमुख उपस्थित होते. एकाच दिवशी तीन पुरस्कार मिळवून डॉ. शेट्टीगार यांनी बेळगावच्या शैक्षणिक क्षेत्रात मोलाचा बहुमान मिळवून दिला आहे.


Recent Comments