Belagavi

समाज निर्मितीत शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची: आम. लक्ष्मी हेब्बाळकर

Share

समाज निर्मितीमध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. बेळगावात आयोजित ६५ व्या तालुकास्तरीय शिक्षक दिन, प्रतिभा कारंजी व क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

जिल्हा पंचायत, शाळा शिक्षण विभाग आणि क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना मंत्री हेब्बाळकर यांनी, प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद असतात, असे सांगत मुलांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी कोलाट आणि बँडिंगचे प्रात्यक्षिक सादर केले. निवृत्त प्राध्यापक डॉ. वाय. एम. याकोळ्ळी यांचे विशेष व्याख्यान झाले, तर हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आशीर्वाद दिले. सोहळ्यात १००० टक्के निकाल लावणाऱ्या शाळांचा, निवृत्त शिक्षकांचा व दात्यांचा सत्कार करण्यात आला.

Tags: