गेल्या ४५ वर्षांची परंपरा जपणाऱ्या ‘कन्नड महिला भुवनेश्वरी उत्सवा’चे यंदाही नवरात्रीच्या मुहूर्तावर उत्साहात आयोजन करण्यात आले. कन्नड महिला संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शेकडो महिलांनी सहभाग घेतला.


नगर येथील बी. के. मॉडेल शाळेच्या सभागृहात भारती वडवी, रंजना नायक, राजश्री केंभावी आणि माहेश्वरी गाळी यांच्या मार्गदर्शनाखाली भुवनेश्वरी उत्सव व विविध स्पर्धा पार पडल्या. या सोहळ्यात २५० हून अधिक महिला उपस्थित होत्या, तर १०० हून अधिक स्पर्धकांनी प्रश्नमंजुषा, रांगोळी, पाककला आणि समूह गायन स्पर्धांमध्ये भाग घेतला.


या स्पर्धांसाठी अर्चना, सविता अन्वेकर, रूपांजली भोसले, मेधा कांगो, शिरीष जोशी, मंजुळा जोशी, वीणा कुलकर्णी आणि श्वेता विजापूरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उषा बाळगी, शीला देशपांडे, लीलू चौगुले, शैला इनामदार, हर्षा बुर्ली, मधुमिता मुतालिक देसाई आणि ज्योती भाविकट्टी यांच्या उपस्थितीत भुवनेश्वरी पूजन करण्यात आले.



Recent Comments