बेळगाव मधील गोमटेश विद्यापीठ कॉलेजमध्ये वर्गात बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्रावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

डिप्लोमा प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वर्गात बसण्यावरून बाचाबाची झाली. या वादादरम्यान एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याच्या खांद्यावर चाकूने वार केले. घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

विद्यार्थी कॉलेजमध्ये सोबत चाकू घेऊन का आला होता, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) आणि पोलीस निरीक्षक (सीपीआय) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Recent Comments