आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यमकमनमर्डी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक पार पडली. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नियमांचे पालन करणाऱ्या सात आदर्श गणेश मंडळांचा स्मृतीचिन्ह व रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

यमकमनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या शांतता बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत भक्ती, सामाजिक सलोखा आणि सौहार्दाच्या वातावरणात साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. न्यायालय आणि सरकारच्या नियमांनुसार डीजे व डिजिटल साऊंड सिस्टीमचा वापर न करता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात डीजेचा वापर न करता वेळेत विसर्जन करून नियमांचे तंतोतंत पालन केल्याबद्दल मंगलमूर्ती गजानन युवक मंडळ, गजानन युवक मंडळ यांच्यासह एकूण सात आदर्श गणेश मंडळांचा स्मृतीचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
त्याचप्रमाणे समाजात शांतता व सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी विशेष योगदान देणारे प्रमुख नागरिक कारेप्पा गुडेन्नवर आणि बंदूलाल मलिक पन्नाारी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.


Recent Comments