Belagavi

कणबर्गीच्या श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रावणी शेवटचा सोमवार उत्साहात साजरा

Share

बेळगावातील कणबर्गी येथे श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारनिमित्त श्री सिद्धेश्वर मंदिरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.

श्रावणी शेवटच्या सोमवारचे औचित्य साधून गावात भव्य पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीत तरुण-तरुणींनी सादर केलेली साहसी प्रात्यक्षिके आणि सजवलेल्या बैलगाड्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या.

श्री सिद्धेश्वर भक्त मंडळाच्या वतीने आयोजित महाप्रसाद वाटप कार्यक्रमात हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला.

Tags: