बेळगावातील केएलई विद्यापीठाच्या आवारातील शिवालयात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रम अत्यंत श्रद्धेने पार पडले. यानिमित्त शिवलिंगाला करण्यात आलेली सफरचंदांची नयनरम्य आरास भाविकांचे विशेष आकर्षण ठरली.

श्रावणी शेवटच्या सोमवारनिमित्त महादेवाचा विशेष महा रुद्राभिषेक, अष्टोत्तर पठण आणि महामंगलारती करण्यात आली. सफरचंदांच्या विशेष अलंकरामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तीमय झाला होता.

शिवालय समितीचे अध्यक्ष मुत्तू, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विश्वनाथ पट्टणशेट्टी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्य पुजारी वेदब्रह्म श्री शंकरय्या शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली पूजा पार पडली असून हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सायंकाळी वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून ‘चिंतन संध्या’ भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


Recent Comments