Belagavi

होन्नीहाळमध्ये आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकारातून रस्ते विकासकामांचा शुभारंभ

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील होन्नीहाळ गावात विविध रस्ते विकासकामांचे भूमिपूजन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पार पडले.

गावातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी ही कामे हाती घेण्यात आली असून, यामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. याप्रसंगी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, गावांच्या सर्वांगीण विकासात रस्ते विकास महत्त्वाची भूमिका बजावतो. नागरिकांच्या गरजा आणि अनेक दिवसांची मागणी लक्षात घेऊन या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे.

रस्ते कामांचा शुभारंभ झाल्याबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आभार मानले.

यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, नागेश देसाई, बाळू देसूरकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.

Tags: