Belagavi

मोदगा गावात आम. हेब्बाळकर यांच्या पुढाकारातून विकासकामांचा शुभारंभ

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मोदगा गावात शेतकरी संपर्क रस्ता आणि स्मशानभूमी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पार पडले.

मोदगा गावातील नागरिकांची अनेक दिवसांची प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि कृषी मालाच्या वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत उपयुक्त ठरणार असून, स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्याचेही डांबरीकरण केले जाणार आहे.

रस्ते विकास ही ग्रामीण भागाच्या प्रगतीची पायाभरणी असून, नागरिकांच्या गरजा विचारात घेऊन विकासकामे राबवली जात असल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले.

यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते.

Tags: