Belagavi

प्रसिद्ध अभिनेते सुदेश बेरी यांची बेळगावच्या शांताई वृद्धाश्रमाला भेट

Share

प्रसिद्ध चित्रपट व मालिका अभिनेते सुदेश बेरी यांनी बेळगाव येथील शांताई वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवला.

वृद्धाश्रमात आगमन झाल्यानंतर ॲलन विजय मोरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वृद्धाश्रमातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून अभिनेत्याचे स्वागत केले. त्यानंतर संस्थेचे संचालक वसंत बलिगा यांनी सुदेश बेरी यांचा सन्मान केला. तसेच मरिया विजय मोरे व चेरिल मोरे यांनी त्यांच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांचा सत्कार केला.

यावेळी सुदेश बेरी यांनी आपले प्रसिद्ध संवाद सादर करून ज्येष्ठांचे मनोरंजन केले. त्यांनी वैयक्तिकरीत्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत सहभोजनाचा आस्वाद घेतला.

Tags: