Khanapur

शिवठाण हायस्कूलचे लोंढा विभागीय क्रिडास्पर्धत यश

Share

शिवठाण ( ता.खानापूर ) येथील श्री रवळनाथ हायस्कूलच्या खेळांडुनी लोंढा विभागीय क्रिडास्पर्धेत भाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या सांघिक स्पर्धेतील व्हाॅलीबाॅल मध्ये मुलांचा संघ प्रथम,तर कबड्डी मध्ये मुलींचा संघ प्रथम, ४x१००मीटर रिले मध्ये मुलीचा संघ प्रथम, तर ४x४०० मीटर रिले मध्ये व्दितीय क्रमांक पटकाविला.
वैयक्तिक स्पर्धेत लक्ष्मण कोलकार, गोळाफेक प्रथम,थाळीफेक प्रथम,व भालाफेक तृतीय क्रमांक पटकाविला.तसेच दीपा शिरोडकर हिने लांब उडीत प्रथम तर श्रेया गावडे हिने ८०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.त्याच बरोबर विविध वैयक्तिक स्पर्धेत समर्थ पाटील,विकी यळगुणावर,वासुदेव मिराशी, नम्रता पाटील,दीपा शिरोडकर,व श्रेया गावडे यानी प्रथम ,व्दितीय, तृतीय क्रमांक पटकाविले.
विजयी खेळाडुना क्रिया शिक्षक पी टी चोपडे यांचे मार्गदर्शन मिळाले . तर मुख्याध्यापक व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले.खेळांडुच्या यशामुळे तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.

Tags: