संस्कृती आणि परंपरेचा वारसा लाभलेल्या बेळगाव शहरात गणेशोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘बेळगावचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चव्हाट गल्लीच्या श्री गणेश मूर्तीचे भव्य मिरवणुकीने आगमन झाले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात माजी आमदार अनिल बेनके, डीसीपी नारायण बरमनी, विजय जाधव, एसीपी संतोष सत्यानायक, खडेबाजार विभागाचे एसीपी, पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, विकास कलघटगी, मुरुगेंद्रगौडा पाटील, सुनील जाधव आणि श्रीनाथ पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

पिरणवाडी येथील मूर्तिकार रवी लोहार यांनी साकारलेली सुमारे २० फूट उंच चतुर्भुज गणेशमूर्ती विशेष लक्ष वेधून घेत आहे. पूजेनंतर पारंपरिक वाद्य आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली.

ही मिरवणूक धर्मवीर संभाजी महाराज चौक मार्गे राणी चन्नम्मा चौक आणि कोर्ट रोडमार्गे चव्हाट गल्लीत पोहोचली. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा उपस्थित भाविकांनी दर्शन घेतले.

मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



Recent Comments